सोन्याचे मंगळसूत्र, सोनाराने घडविले
........ चे नाव घेण्यासाठी ........ ने अडविले
पाऊस पडतो रिमझिम रात्र होते गहरी
........ च्या जीवनात खुलवीन आनंद सुखाच्या लहरी
मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला
........ रावांना आईवडिलांनी अर्पण केली मला
पुढे जाते वासरू, मागे चालते गाय
........ ला आवडते दुधावरची साय
चहा नको ,कॉफी नको, नवीन निघाला कोको
........ शिवाय मला दुसरे काही नको
जाळीच्या नगरात होतो, श्रीकृष्णाचा गजर
........ चे नाव घ्यायला मी आहे हजर
नाशिकचे द्राक्षे, नागपूरचे संत्री
........ राव आहेत माझे गृहमंत्री
गुलाबाचे फुल, आवडते मला लाल
........ चे नाव घेते, सुरु झाले ........ साल
चहा केला नेऊन दिला, आता करते कोको
........ चे नाव घ्यायला इतका आग्रह नको
फुलाची पाकळी न पाकळी असते देवासाठी
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण न क्षण ........ च्या सुखासाठी
No comments:
Post a Comment