संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
----- रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा
आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
-----राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा
ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
----- सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,
----- रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
----- चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद
अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ----- च्या पाठीशी राहा हि मनीषा
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
----- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते
गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात